दिवाळीचा सण हा रंक -रावांसाठी आनंदाचा सण असतो . या सणाकरिता प्रत्येकच घरात आनंदाचे वातावरण असते .या आनंदी वातावरणाला द्विगुणीत करण्याकरिता शिंदे - फडणवीस सरकारने आनंदाचे कीट या संकल्पनेतून शिधा वाटप करण्याचे ठरविले होते परंतु रास्त दुकानदारांच्या दुकानावर फिरलो असता तेथे गोंधळ उडायचे दिसून आले .
पॉस मशीन बंद पडणे ' लोकांना रास्त दुकानात त्रास होणे . रास्त दुकानदारांना सुद्धा या वाटपात खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली . यासंदर्भात माननीय तहसीलदार संजय जाधव व पुरवठा अधिकारी शिरीष कापडे यांना फोन केला असता त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली आणि सर्व रास्त दुकानदारांना बोलावून ऑफलाइन पद्धतीने आनंदाच्या किडचे वाटप करावे असे आदेश दिले .यामुळे समस्त लाभार्थ्यांनी सुद्धा मा .तहसीलदार यांचे व रास्त दुकानदारांचे तथा शासनाचे मनोमन आभार मानले .
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
Comments