top of page

दिवाळीचा सण हा रंक -रावांसाठी आनंदाचा सण असतो . या सणाकरिता प्रत्येकच घरात आनंदाचे वातावरण असते .या आनंदी वातावरणाला द्विगुणीत करण्याकरिता शिंदे - फडणवीस सरकारने आनंदाचे कीट या संकल्पनेतून शिधा वाटप करण्याचे ठरविले होते परंतु रास्त दुकानदारांच्या दुकानावर फिरलो असता तेथे गोंधळ उडायचे दिसून आले .

आनंदाचा शिधा

पॉस मशीन बंद पडणे ' लोकांना रास्त दुकानात त्रास होणे . रास्त दुकानदारांना सुद्धा या वाटपात खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली . यासंदर्भात माननीय तहसीलदार संजय जाधव व पुरवठा अधिकारी शिरीष कापडे यांना फोन केला असता त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली आणि सर्व रास्त दुकानदारांना बोलावून ऑफलाइन पद्धतीने आनंदाच्या किडचे वाटप करावे असे आदेश दिले .यामुळे समस्त लाभार्थ्यांनी सुद्धा मा .तहसीलदार यांचे व रास्त दुकानदारांचे तथा शासनाचे मनोमन आभार मानले .

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



-: स्वप्न :-

आपण सर्व नेहमी स्वप्न बघतो पण प्रत्येक स्वप्नाला सत्यतेमध्ये उतरविण्यासाठी भरपूर मेहनत व कालावधी लागतो.असेच स्वप्न ग्रामीण भागातील एका ध्येयवेड्या व्यक्तीने बघितले ज्यांचे नाव होते देवरावजी नाईकवाड. दारव्हा सारख्या ग्रामीण भागात राहून जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे ते स्वप्न होते.

Official Logo of Akshay Multimedia
Official Logo of Akshay Multimedia Pvt Ltd

-: सुरुवात :-

सण १९७१ मध्ये कमीतकमी भांडवल गुंतवणूक सुरुवात करण्यात आली अगदी छोट्या व्यवसायाची तेव्हा त्याचे नाव होते अक्षय पब्लिसिटी ! अगदी छोटीशी जागा, मोजक्याच मशिनरीज पण स्वप्न मात्र खूप खुप मोठे आणि त्यावेळी सुरु झाला एक प्रवास स्वप्नांना सत्यतेमध्ये बदलविण्याचा, सलग ३४ वर्षे ते झटत राहिले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हळूहळू स्वप्नांना आकार मिळत गेला व सुरुवात झाली अक्षय मल्टिमीडिया ची.

Akshay Multimedia Darwha
Akshay Multimedia Pvt Ltd

-: सत्य :-

अक्षय पब्लिसिटी ते अक्षय मल्टिमीडिया हा प्रवास अगदी थक्क करणारा होता. दारव्हा सारख्या छोट्याशा ठिकाणाहून सुरु झालेला हा प्रवास त्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये जाहिरात क्षेत्राला फार काही महत्व नव्हते. त्यामुळे वेळोवेळी लोकांना जाहिरात कारण्यासाठी प्रोत्साहित करावे लागायचे, कधी कधी तर अगदी कमी किमतीमध्ये काम करून द्यावे लागायचे पण हळूहळू लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला लागली. सायकल रिक्षा ते ऑटोरिक्षा, रेडिओ अशा विविध माध्यमांमधून जाहीराती सुरु झाल्या. जाहिरात केल्यानंतर झालेले फायदे व्यावसायिकांना दिसायला लागले व मागणी वाढू लागली. फक्त एक माइक व एक टेपरेकॉर्डर पासून सुरु झालेला हा प्रवास आज महाराष्ट्रातील नामांकीत advertising agency पर्यंत सलग सुरु आहे.आज तर अक्षय मल्टिमीडिया हि जाहिरातींच्या सर्वच क्षेत्रामध्ये अगदी उत्कृष्ठ कार्य करीत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज आमचे ५००००+ आनंदी ग्राहक आहेत.


Akshay Multimedia Darwha
Advertising Marketing | Photography | Graphic Design

आज अक्षय मल्टिमीडिया जाहिरात, फोटोग्राफी व ग्राफिक डिझाईनच्या क्षेत्रातील सर्वच कामे एकाच ठिकाणाहून आमच्या ग्राहकांसाठी देणारी एकमेव प्रायव्हेट कंपनी आहे. आमच्या काही महत्वाच्या सेवा खालील प्रमाणे : -

  • Voice Over

  • Business Advertising

  • Social Media Advertising

  • Radio Jingles

  • Audio / Video Editing

  • Bulk Call & SMS

  • Business Promotion

  • Product Promotion

  • ​Event Photography

  • Wedding Photography

  • Cinematic & Candid

  • Short Films

  • Prewedding & Baby Shower

  • Theme Song

  • LED Wall - All size

  • Drone - Helicam

  • Social Media Design

  • Banner Design

  • Album Design

  • 3D Product Design

  • Packaging Design

  • Book Layout Design

  • Website Design

  • Professional Logo Design

या व अशा भरपूर सेवा-सुविधा एकाच छताखाली ज्याचे नाव आहे - अक्षय मल्टिमीडिया,दारव्हा.


आमचा पत्ता : अक्षय मल्टिमीडिया अंबिका नगर, बुद्ध विहार जवळ,दारव्हा जि.यवतमाळ (महाराष्ट्र) 445202


व्हाट्सअप : +91 9423663496


 
 
 

Loading......

bottom of page